Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रात कांद्याला चांगला समाधानकारक दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. गेल्या कित्येक महिन्यांनी आता कुठे कांद्याला समाधानकारक दर मिळू लागल्याने दोन पैसे हाती येतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. खरे तर, लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्रातील सरकारने घाई घाईने कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मात्र कांदा निर्यात सुरू करतानाच केंद्रातील सरकारने किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क सुद्धा लागू केले. यामुळे सरकारने कांदा निर्यात सुरू केली असली तरी देखील अप्रत्यक्षरीत्या ही निर्यात बंदीच आहे असा आरोप शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केला जात आहे.
हेच कारण आहे की सरकारने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कांदा निर्यातीसाठी लावण्यात आलेले कठोर निर्बंध शिथिल केले पाहिजेत अशी मागणी आता जोर धरत आहे. कांदा निर्यातीसाठी कठोर निर्बंध असतानाही देशांतर्गत वाढलेली मागणी पाहता कांद्याला चांगला दर मिळतोय. पण, कांदा निर्यातीसाठीचे हे निर्बंध काढलेत तर बाजार भाव आणखी वाढणार आहेत. यामुळे हे निर्बंध मागे घेण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, आज राज्यातील एका बाजारात कांद्याला तब्बल 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान 3500, सरासरी 4000 आणि कमाल 4500 असा भाव मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील इतर प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 900, कमाल 2870 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सायखेडा उपबाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1600, कमाल 3000 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1300, कमाल 3000 आणि सरासरी 2725 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 2860 आणि सरासरी 2675 एवढा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 2929 आणि सरासरी 2700 असा भाव मिळाला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी 1300, जास्तीत जास्त 2708 आणि सरासरी 2575 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1200, कमाल 3000 आणि सरासरी 2100 असा भाव मिळाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 3000 आणि सरासरी 2000 असा भाव मिळाला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान शंभर, कमाल 2570 आणि सरासरी दोन हजार असा भाव मिळाला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान तेराशे, कमाल 2900 आणि सरासरी 2100 असा भाव मिळाला आहे.