10th 12th Board Exam : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आलेली आहे. खरे तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता बोर्ड परीक्षेचे वेध लागलेले आहे.
कारण की बोर्ड परीक्षा आता जवळ येऊ लागल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांनी कसून अभ्यासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान अभ्यासात व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षाच्या बाबतीत एक अतिशय दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयातुन दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंडळांने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांसाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
म्हणजेच जर एखाद्या पेपरासाठी तीन तासांचा वेळ दिलेला असेल तर आता या नवीन निर्णयानंतर हा पेपर लिहिण्यासाठी तीन तास आणि दहा मिनिटाचा कालावधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
खरे तर मंडळांने घेतलेला हा निर्णय काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी बोर्डाच्या पेपरासाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला जात असे.
म्हणजे जर पेपर 11 ला सुरू होणार असला तर तो 10:50 ला सुरू केला जात असे. याचे कारण म्हणजे या दहा मिनिटांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिकेचे आकलन करता येत असे.
यामुळे पेपर फुटी आणि कॉपी सारख्या प्रकारांवर निर्बंध लागले होते. हेच कारण आहे की आता पुन्हा एकदा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या पेपरासाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
गेल्या काही वर्षात पेपर फुटी आणि कॉपी प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे बोर्डाचा पेपर लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन करता येणार आहे. निश्चितच हा निर्णय दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा हिताचा ठरणार आहे.