10th And 12th Board Exam Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.
नेहमीप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतल्या गेल्यात. या परीक्षा आता नुकत्याच संपल्या असून विद्यार्थ्यांचे सारे लक्ष रिझल्टकडे लागले आहे.विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने बोर्डाचे पेपर दिले आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील अशी आशा आहे. खरे तर महाराष्ट्र बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल हे सीबीएससी बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतरच जाहीर होत असतात.
त्यामुळे सीबीएससी बोर्डाचे निकाल केव्हा जाहीर होणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान आज आपण याच संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.
केव्हा निकाल लागणार
सीबीएससी बोर्डाचे निकाल केव्हा लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सीबीएससी बोर्ड दरवर्षी आधी बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करत असते आणि यानंतर दहावीच्या बोर्डाचे रिझल्ट डिक्लेअर केले जात असतात.
यंदा देखील हाच पॅटर्न राहणार आहे. आधी बारावीचे निकाल येतील आणि त्यानंतर मग 10वी चे निकाल जाहीर होतील. मात्र अजूनही सीबीएससी बोर्डाकडून दहावी आणि बारावीचे रिझल्ट नेमक्या कोणत्या तारखांना जाहीर होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तथापि गेल्या तीन वर्षांचा पॅटर्न पाहिला असता आपण सीबीएससी बारावीचे रिझल्ट केव्हा डिक्लेअर होऊ शकतात याचा एक अंदाज बांधू शकतो. गेल्या तीन वर्षांचा बारावी बोर्डाच्या रिझल्टच्या तारखा पाहिल्या असता मे 2024 मध्ये सीबीएससी बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2021 मध्ये सीबीएससी बोर्डाने बारावीचा निकाल 3 मे रोजी जाहीर केला होता. 2022 मध्ये मात्र बोर्डाने 17 मे ला रिझल्ट डिक्लेअर केला होता. तसेच 2023 मध्ये सीबीएससी बोर्डाने बारावीच्या परीक्षेचा निकाल 12 मे ला डिक्लेअर केला होता.
यावरून यंदाही सीबीएससी बोर्ड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असे दिसत आहे. दरम्यान बारावी बोर्डाचा निकाल लागला की लगेचच सीबीएससी बोर्ड दहावीचा देखील निकाल जाहीर करणार आहे.
मग सीबीएससी बोर्डाचे दोन्ही वर्गाचे रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर होईल असे म्हटले जात आहे.