10th Board Exam : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर, येत्या काही दिवसात दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे. यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे बोर्ड परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र अर्थातच हॉल तिकीट बोर्डाच्या माध्यमातून लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्या अर्थातच 31 जानेवारी 2024 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
खरे तर दहावी बोर्डाची परीक्षा एक मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिवांनी याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे.
सचिवांनी म्हटल्याप्रमाणे उद्यापासून अर्थातच बुधवारपासून दहावी बोर्ड परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. हे हॉल तिकीट मंडळाने दिलेल्या स्कूल लॉगिन मध्ये उपलब्ध होणार आहे.
अर्थातच हे हॉल तिकीट फक्त शाळांना ऑनलाइन पद्धतीने काढता येणार आहे. शाळा ऑनलाईन हॉल तिकीट काढून त्यावर मुख्याध्यापकाची सही आणि शिक्का घेऊन ते हॉल तिकीट विद्यार्थ्यांना वितरित करणार आहेत.
विशेष म्हणजे हॉल तिकीट साठी विद्यार्थ्यांकडून कोणतेच अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हॉल तिकीटची वाट पाहिली जात होती ते दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आता उद्यापासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
यामुळे आता विद्यार्थ्यांना एक मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी कसून अभ्यास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे दहावी बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 10 फेब्रुवारीपासूनचं सुरू होणार आहे.