300 Day PNB FD Scheme : पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी आहेत. यात पंजाब नॅशनल बँक अर्थातच पीएनबीचा देखील समावेश होतो.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध एफडी योजना राबवत आहे. सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडी योजना बँकेकडून ऑफर केल्या जात आहेत.
दरम्यान, आज आपण बँकेच्या अशा एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकणार आहे. आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या 300 दिवसाचा एफ डी योजनेची माहिती पाहणार आहोत.
कशी आहे 300 दिवसाची FD Scheme ?
PNB कडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 300 दिवसांच्या FD Scheme वर चांगले व्याज दिले जात आहे. या बँकेकडून तीनशे दिवसांच्या FD स्कीमवर 7.10% एवढे व्याजदर दिले जात आहे.
विशेष बाब अशी की, या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 0.50% अधिकचे व्याज ऑफर होत आहे. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणुकीसाठी 7.60% एवढे व्याज दिले जात आहे.
एवढेच नाही तर सुपर सिनियर सिटीजनने या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना 7.90% एवढे व्याज मिळणार आहे.
अशा परिस्थितीत, जर एक सामान्य ग्राहक या 300 दिवसांच्या एफडी योजनेत तीन लाख रुपये गुंतवत असेल तर त्याला मॅच्युरिटीवर 3 लाख 17506.85 मिळणार आहेत. अर्थातच सदर ग्राहकाला 17,506.85 एवढे व्याज मिळणार आहे.
जर ज्येष्ठ नागरिकांनी या तीनशे दिवसांच्या एफडीत 3 लाख गुंतवलेत तर त्यांना मॅच्युरिटीवर 3 लाख 18,739.73 रुपये मिळतील. यामध्ये १८७३९.७३ रुपये एवढ व्याज राहणार आहे.
जर सुपर सीनियर सिटीजनने या योजनेत तीन लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना मॅच्युरिटीवर 3 लाख 19 हजार 479.45 रुपये मिळणार आहेत. अर्थातच १९४७९.४५ रुपये हे या एफडी योजनेतील व्याज राहणार आहे.