7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढीची भेट मिळणार आहे. कारण की सरकारी नोकरदार मंडळीचा पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला होता. आता पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत भत्ता वाढणार आहे.
जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता मात्र यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे. महागाई भत्ता 50% होण्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता.
पण यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. दरम्यान आता नियमाप्रमाणे जुलै महिन्यापासूनही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढला आहे मात्र जुलै महिन्यापासून चा महागाई भत्ता अजून वाढलेला नाही.
ही महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे. जानेवारी ते जून या कालावधीमधील एआयसीपीआयची आकडेवारी जुलै महिन्यापासून महागाई भत्ता नेमका किती वाढणार ? हे ठरवणार आहे.
दरम्यान, काही जाणकार लोकांनी गेल्यावेळी अर्थात जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला असल्याने जुलै महिन्यापासून देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनीच वाढेल असे म्हटले आहे. म्हणजेच जुलै महिन्यापासून महागाई भत्ता 54 टक्क्यांवर जाणार आहे.
पगारात किती वाढ होणार ?
जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 50 हजार रुपये असेल तर सदर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू झाल्यास दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर विचार केला तर एका आर्थिक वर्षातच 24 हजार रुपयाचा लाभ सदर कर्मचाऱ्याला मिळणार आहे.