7th Pay Commission : देशभरातील लाखों केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची गणना ही लवकरच चेंज केली जाणार आहे. जुलै 2024 पासून महागाई भत्त्यात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मात्र, महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन का बदलणार आहे ? यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय फरक पडणार ? ही त्यांच्यासाठी चांगली बातमी कशी काय ठरणार आहे हे समजून घेणे महत्त्वाचे राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता 46% वरून 50 टक्के एवढा केला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे.
शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जात असते. जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यात महागाई भत्ता सुधारित केला जातो. यानुसार आता महागाई भत्त्याची पुढील वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे. मात्र, त्याला मंजुरी मिळण्यासाठी सप्टेंबर महिना लागू शकतो.
म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पगारांसोबत याचा रोख लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान आता आपण महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन कसे बदलणार आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
महागाई भत्ता शून्य होणार
महागाई भत्ता (DA) स्कोअर निर्धारित करणारे AICPI निर्देशांक जानेवारी ते जून 2024 दरम्यान जारी केले जातील. खरे तर आतापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंतचा डाटा समोर आला पाहिजे होता. मात्र, सध्या फक्त जानेवारी 2024 चा डेटा समोर आला आहे.
ही एआयसीपीआयची आकडेवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवते. मात्र जानेवारीनंतर ही आकडेवारी समोर आली नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये महागाई भत्ता आत्ता शून्य होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.
म्हणजेच आता महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा 0 पासून सुरू होणार आहे. लेबर ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्तामध्ये बदल होणार हे जवळपास निश्चित आहे. तथापि, सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी 31 जुलै 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान महागाई भत्ता शून्य झाल्यानंतर सध्याची महागाई भत्त्याची रक्कम म्हणजे 50 टक्के दराने जो महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळत आहे ती रक्कम त्यांच्या मूळ पगारात म्हणजेच बेसिक सॅलरीमध्ये जोडली जाणार आहे. यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांचा पगार मोठा वाढेल अशी आशा आहे. म्हणून ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज राहणार आहे.
पगार नऊ हजार रुपयांपर्यंत वाढ होणार
महागाई भत्ता शून्य झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 9000 रुपयांपर्यंत वाढ होईल. ही वाढ किमान पगारावर मोजली जाईल. समजा, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याचा पगार वाढून 27000 रुपये होईल. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार २५००० रुपये असेल तर त्याच्या पगारात १२५०० रुपयांची वाढ होईल.
हे घडेल कारण, एकदा महागाई भत्ता रद्द झाल्यानंतर तो मूळ वेतनात विलीन केला जाईल. मात्र मागील वेळी जेव्हा महागाई भत्ता शून्य झाला त्यावेळी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. यामुळे, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्य होणार की त्याआधीच महागाई भत्ता शून्य केला जाणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.