7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रचार सभा घेतल्या जात आहेत. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे राजकीय सनई-चौघडे वाजत आहेत. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून 2024 ला जाहीर केला जाणार आहे.
यानंतर केंद्रात नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे. अशातच मात्र महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
याचा निर्णय केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात घेतला असून महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या पगारा सोबत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.
केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित होते.
परंतु वर्तमान शिंदे सरकारने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला नाही. आता मात्र लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय वर्तमान शिंदे सरकारकडून घेतला जाईल अशी बातमी समोर येत आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय वर्तमान शिंदे सरकार निर्गमित करू शकते असे म्हटले जात आहे. याचा रोख लाभ हा जून महिन्याचा पगारा सोबत दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू केली जाणार असून जानेवारी ते मे या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील जून महिन्याच्या पगारांसोबत मिळणार आहे.
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत आणि याच विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून लोकसभा झाल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.