7th Pay Commission : सणासुदीच्या काळात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए चार टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळात याबाबतचा निर्णय झाला आहे. सदर निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 42 टक्क्यांवरून 46 टक्के एवढा झाला आहे. अर्थातच यामध्ये चार टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै 2023 पासून लागू करण्यात आली आहे. याचा रोखीने लाभ या चालू महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे.
अर्थातच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची डीए थकबाकी देखील मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने डीएवाढीचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने देखील या धर्तीवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के एवढा केला आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत काल अर्थात 27 ऑक्टोबर 2023 रोजी निर्णय घेतला आहे.
सदर निर्णयानुसार, आता अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के एवढा होणार आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय काल 27 ऑक्टोबरला निर्गमित झाला आहे. या कर्मचाऱ्यांना आता या चालू महिन्याच्या वेतना सोबत या महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
सोबतच सदर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी देखील दिली जाणार आहे. यामुळे दिवाळीच्या पूर्वीच या कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता थकबाकी याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना देखील मिळणार असल्याने केंद्रीय कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारीप्रमाणेच या लोकांची देखील दिवाळी गोड होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर महागाई भत्ता वाढवला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. यामुळे आता शिंदे सरकारी याबाबत केव्हा निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.