7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (CGHS) लाभार्थ्यांच्या आयडीला आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) च्या ID सोबत जोडणे बंधनकारक करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
याबाबतचा निर्णय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) घेतलेला आहे. दरम्यान आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची आयडी आयुष्मान भारत योजनेच्या आयडी सोबत जोडण्यासाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत ची मुदत दिलेली आहे.
अशा परिस्थितीत या महिन्याअखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना हे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. येत्या 27 दिवसांच्या आत सर्व विद्यमान लाभार्थ्यांनी CGHS लाभार्थी ID ABHA ID शी लिंक करणे अनिवार्य असल्याची माहिती मंत्रालयाने यावेळी दिली आहे.
CGHS लाभार्थी ID ABHA ID शी जोडण्याचा उद्देश CGHS लाभार्थ्यांची डिजिटल आरोग्य ओळख तयार करणे आणि त्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदी गोळा करणे हा आहे. यामुळे हे काम केंद्रीय कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
निश्चितच जर तुम्हीही केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची आयडी सुद्धा आयुष्मान भारत आरोग्य खात्याच्या आयडी सोबत लिंक करावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 42 लाख एवढी असून या सदर लाभार्थ्यांना आता आपली आयडी आयुष्मान भारत योजनेच्या आयडी सोबत लिंक करावी लागणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि घर भाडे भत्ता वाढला
दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे.
विशेष म्हणजे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. अभी केंद्रीय कर्मचाऱ्यांना X, Y आणि Z श्रेणीनुसार अनुक्रमे 27% 18% आणि 9% एवढा घर भाडे भत्ता दिला जात होता.
आता मात्र हा भत्ता अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के असा झाला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे.