7th Pay Commission DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोड बातमी समोर येत आहे. खरेतर सदर नोकरदार मंडळी गेल्या काही दिवसांपासून 2024 मधल्या पहिल्या सहामाहीतल्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत.
केंद्र सरकारकडून जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. जुलै 2023 पासून हा दर लागू आहे.
यापूर्वी महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता. म्हणजेच जुलै 2023 पासून DA मध्ये चार टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मात्र ऑक्टोबर 2023 मध्ये घेण्यात आला होता.
म्हणजेच याचा रोखीने लाभ ऑक्टोबर 2023 मध्ये देण्यात आला आहे. दरम्यान आता जानेवारी 2024 पासून पुन्हा एकदा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे.
किती वाढणार महागाई भत्ता
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता चार टक्क्याने वाढणार आहे.
आतापर्यंतचा ट्रेंड पाहता अनेक जाणकार लोकांनी महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.
म्हणजेच सध्याच्या 46% DA मध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे. अर्थातच हा महागाई भत्ता 50% एवढा होईल. याबाबतची घोषणा मात्र 15 मार्च 2024 नंतर होईल असा अंदाज आहे.
अर्थातच मार्च महिन्याच्या पगारासोबत याचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे. या पगारांसोबत महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वितरित होणार आहे.
जर मार्च महिन्यात चार टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय झाला आणि याचा रोखीने लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत देण्याचे जाहीर झाले तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मार्च महिन्याच्या पगारासोबत दिली जाणार आहे.