7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात आहे. खरंतर, प्रत्येक सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो. एका वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.
जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो. यानुसार केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवला आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यांवरून 50% झाला आहे. याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात झाला होता.
दरम्यान, जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीनंतर आता जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीकडे सरकारी नोकरदार मंडळीचे मोठे बारीक लक्ष आहे. केंद्रातील कर्मचाऱ्यांचे तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे देखील या वाढीकडे विशेष लक्ष आहे.
खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला जात असतो. जानेवारी महिन्यापासून देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाला आहे.
यामुळे जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जेवढा महागाई भत्ता वाढणार आहे तेवढाच महागाई भत्ता आपल्या राज्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा देखील वाढणार आहे. हेच कारण आहे की जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार याकडे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष आहे.
दरम्यान याच महागाई भत्ता वाढी संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार म्हणजेच एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते.
जुलै 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीमधील एआयसीपीआयची आकडेवारीनुसार ठरणार आहे. मात्र सध्या स्थितीला एआयसीपीआयची जानेवारी ते मे या कालावधी मधील आकडेवारी समोर आली आहे.
जून महिन्याची आकडेवारी ही जुलै महिन्याच्या अखेरीस समोर येणार आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याची आकडेवारी पाहिली असता महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार असे दिसत आहे.
अर्थातच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून जुलै महिन्यापासून हा भत्ता 53 टक्क्यांवर पोहोचणार आहे. यासोबतच घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरानुसार घर भाडे भत्ता मिळतोय.
एक्स, वाय आणि झेड श्रेणीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अनुक्रमे 27%, 18% आणि 9% असा घरभाडे भत्ता लागू आहे. मात्र सातवा वेतन आयोग अंतर्गत जेव्हा महागाई भत्ता 50% टच करेल तेव्हा हा घर भाडे भत्ता अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के असा होणार आहे.