7th Pay Commission : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत नुकतेच एक नवीन अपडेट समोर आले आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेचे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे.
म्हणजेच महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. महागाई भत्ता 50% झाल्यामुळे एचआरए समवेतच इतर सर्व भत्ते वाढले आहेत.
एच आर ए अर्थातच घर भाडे भत्ता हा तब्बल तीन टक्क्यांनी वाढला आहे. सध्या शहरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळतोय. आधी एक्स कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 18%, झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के असा HRA दिला जात असे.
आता मात्र एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30%, 20% आणि 10% असा घरभाडे भत्ता मिळतोय. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता शून्य होणार अशी बातमी समोर आली आहे.
जुलै 2024 पासून मिळणारा महागाई भत्ता पुन्हा शून्य (0) वरून मोजला जाईल असा दावा केला जातोय. जानेवारी ते जून दरम्यान AICPI निर्देशांकाच्या आधारे आता शून्यापासून महागाई भत्ता निश्चित केली जाणार आहे.
जानेवारी AICPI क्रमांक फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आले. त्यानुसार महागाई भत्त्यात १ टक्का वाढ झाली आहे. म्हणजे ५१ टक्के झाला आहे. परंतु, फेब्रुवारीचे AICPI निर्देशांक अद्याप जाहीर झालेले नाहीत.
अशा स्थितीत ती शून्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमांनुसार, 50 टक्के महागाई भत्ता झाला की सदर महागाई भत्त्याची रक्कम ही मूळ वेतनात जोडली जाईल आणि DA ची गणना परत शून्यापासून सुरू होईल.
परंतु, कामगार विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती तसेच स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही. याचा अर्थ महागाई भत्त्याची गणना ही 50 टक्क्यांच्या पुढेही चालूच राहणार आहे.
यामुळे महागाई भत्ता केव्हा शून्य होणार हा सवाल अजूनही कायम आहे. तथापि लवकरच याबाबत योग्य ती माहिती समोर येईल अशी आशा आहे. जेव्हा जुलैपासून महागाई भत्ता सुधारित केला जाईल तेव्हा महागाई भत्ता रक्कम मूळ वेतनात जोडली जाते की नाही हे कळणार आहे.