7th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ही चर्चा सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबत. मार्च 2023 मध्ये केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आणि महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला.
महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये चार टक्के वाढ झाली. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. याचाच अर्थ जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. अशातच आता डीए मध्ये आणखी चार टक्के वाढ होणार अशा बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियामध्ये देखील याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. काही लोक जुलै महिन्यापासून 3 टक्के महागाई भत्ता वाढणार तर काही लोक चार टक्के महागाई भत्ता वाढणार असे सांगत आहेत. दरम्यान एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
अर्थातच जुलै DA आता 46% एवढा होणार आहे. तसेच वाढती महागाई पाहता जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता 50% होईल असा दावा देखील सदर मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण जर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाला तर काय होऊ शकत याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
7व्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेल्यावर, महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल. याचा अर्थ महागाई भत्त्याची गणना 0 पासून सुरू होईल आणि 50 टक्के महागाई भत्ताचा पैसा हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जमा केला जाईल. यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातं हजारो रुपयांची वाढ होणार आहे.
2016 मध्ये ज्यावेळी 7 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जात होती तेव्हा महागाई भत्ता शून्यावर आणला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार 18 हजार रुपये असेल तर त्याला पन्नास टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर 9000 रुपये महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता हा नऊ हजार रुपये महागाई भत्ता मूळ पगारात जोडला जाईल.
म्हणजेच कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 27,000 पर्यंत वाढणार आहे. साहजिकच यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. याव्यतिरिक्त ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा HRA म्हणजेच घर भाडे भत्ता देखील वाढवला जाणार आहे. घर भाडे भत्ता त्यावेळी तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. एकंदरीत येणारे नवीन वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायद्याचे राहणार आहे.