7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. गेल्या महिन्यात गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला आहे. दरम्यान या चालू महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे.
अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. या चालू वर्षातील दुसऱ्या सहामाहीतील DA वाढ लवकरच लागू होणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार डी ए वाढीची घोषणा विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या सुमारास केली जाणार आहे. त्यामुळे यंदाचा दसरा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा लाभदायी ठरणार असल्याचे चित्र आहे.
शासनाने हा निर्णय घेतल्यास सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आता चार टक्के वाढ होणार आहे. याबाबत शासनाने कोणतीच माहिती दिलेली नसली तरी देखील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्त्यात चार टक्क्यांपर्यंत वाढ होणे जवळपास निश्चित आहे.
विशेष म्हणजे ही वाढ जुलै 2023 पासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे जेव्हा ही वाढ लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांना डीए थकबाकीची रक्कम देखील मिळणार आहे. साहजिकच महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता थकबाकी यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त देशातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बोनस देखील मिळणार आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस?
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसच्या स्वरूपात जवळपास 78 दिवसांचे वेतन बोनस म्हणून दिले जाते. मात्र सध्या स्थितीला रेल्वे कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग अंतर्गत बोनस मिळत आहे.
दरम्यान या संबंधित नोकरदार वर्गाला सातवा वेतन आयोग अंतर्गत बोनस मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्या सहाव्या वेतन आयोग अंतर्गत 17,951 रुपयांपर्यंत बोनस मिळतो. पण सातवा वेतन आयोग अंतर्गत हा बोनस 46159 पर्यंत वाढू शकतो. यामुळे आता शासन याबाबत कोणता निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.