7th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरात लवकर 50% डीए चा लाभ मिळायला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने महागाई भत्ता वाढीची भेट दिली होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा मोठा निर्णय केंद्रातील सरकारने घेतला आहे.
यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के करण्यात आला आहे. जानेवारी 2024 पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. याचा रोख लाभ मात्र मार्च महिन्याचा पगारासोबत दिला गेला आहे. या सदर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळाली आहे.
केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतल्यानंतर अनेक राज्यातील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता देखील वाढवला आहे.
मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही. दरम्यान याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% वाढवण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे.
याचा जीआर लोकसभा निवडणुका झाल्यात की लगेचच निर्गमित केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवली जात आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारा सोबत 50% दराने महागाई भत्ता लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मे या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील जून महिन्याच्या पगारासोबतच वर्ग केली जाणार आहे.
खरे तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढीचा लाभ जून महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.