7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी की असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी, म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मास्टर स्ट्रोक खेळला. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून वाढवून 50 टक्के एवढा करण्याचा मोठा निर्णय घेतला.
महागाई भत्ता वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे. परंतु मार्च महिन्याचे वेतनासोबत फक्त महागाई भत्ता वाढीचाच लाभ मिळणार असे नाही तर आणखी काही लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. यामुळे आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोणते मोठे आर्थिक लाभ होणार आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
एकाच वेळी मिळणार हे आर्थिक लाभ
महागाई भत्ता वाढ : जानेवारी 2024 महिन्यापासून केंद्र शासनाने महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ हा मार्च महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे.
पण महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला नाही. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही 46 टक्के एवढाच आहे.
महागाई भत्ता फरक : आधी कर्मचाऱ्यांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात होता. आता हा भत्ता 50% एवढा झाला आहे. पण ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू होईल. यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल अशी आशा आहे.
घरभाडे भत्ता : जेव्हा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा घर भाडे भत्ता ज्याला एच आर ए म्हणतात तो देखील वाढणार अशी तरतूद होती. यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हा देखील तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
आतापर्यंत X, Y आणि Z कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के असा HRA मिळत होता. आता मात्र X, Y आणि Z कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30, 20 आणि 10 टक्के असा घर भाडे भत्ता दिला जाणार आहे. यामुळेही पगारात मोठी वाढ होणार आहे.