7th Pay Commission : देशभरातील एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे महागाई भत्ता संदर्भात. खरंतर मार्च 2023 मध्ये केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता.
या निर्णयानुसार जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा करण्यात आला आहे. याआधी हा महागाई भत्ता 38% एवढा होता. म्हणजेच यामध्ये चार टक्के एवढी वार करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
मात्र गेल्या काही महिन्यांचा ट्रेंड पाहता जुलै महिन्यापासून देखील चार टक्के डीए वाढणार असे सांगितले जात आहे. याचाच अर्थ आता जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 46 टक्के एवढा होणार आहे. यामुळे देशभरातील एक कोटींपेक्षा अधिक कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी राहणार आहे.
सरकार केव्हा घेणार निर्णय?
खरंतर येत्या काही दिवसात g20 शिखर परिषद आयोजित होणार आहे. ही शिखर परिषद यंदा भारतात आयोजित होणार आहे. दरम्यान या शिखर परिषदेनंतर देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार दिलासा देणार आहे. शिखर परिषदेनंतर होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रातील मोदी सरकार महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करणार आहे.
ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. यानुसार जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएस 46 टक्के एवढा होईल. याचाच अर्थ जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. एवढेच नाही तर येत्या 120 दिवसात म्हणजेच जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 50 टक्के होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.