7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला. मार्च महिन्याच्या पगारा सोबत याचा रोख लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. मात्र हा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासूनच लागू करण्यात आला होता. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता फरकाचीही रक्कम मिळाली आहे.
दरम्यान, आता जुलै महिन्यापासूनही केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो. जानेवारी ते जून 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार हा महागाई भत्ता ठरवला जाणार आहे.
आतापर्यंत जानेवारी ते मे या कालावधीमधील एलआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे. मे 2024 साठी AICPI निर्देशांकाचे आकडे नुकतेच अद्ययावत करण्यात आले आहेत. यानुसार महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आता फक्त जूनचे आकडे येणे बाकी आहे, जे 31 जुलैला प्रसिद्ध होणार आहेत. जून महिन्याची आकडेवारी समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
अजून जून महिन्याची आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, जुलैपासून महागाई भत्त्यात ३% वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर पोहोचणार आहे.
वास्तविक, मे 2024 मध्ये AICPI निर्देशांक 139.9 अंकांवर पोहोचला आहे. यामध्ये 0.5 अंकांची झेप दिसून आली आहे. या आधारे महागाई भत्त्याची गणनाही ५२.९१ टक्के झाली आहे. पण याची गणना 53 टक्के अशी केली जाणार आहे.
तथापि, आणखी एक महिन्याचा डाटा येणे बाकी आहे. मात्र या एका महिन्याच्या आकडेवारीने फारसा फरक पडणार नाहीये. तज्ञांच्या मते, गणनांच्या आधारे, एआयसीपीआयच्या जून 2024 च्या आकडेवारीत 0.5 अंकांपर्यंत वाढ होऊ शकते.
असे झाले तरी महागाई भत्त्याच्या स्कोअरवर कोणताही परिणाम होणार नाही. एकंदरीत जुलै 2024 पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% आहे आणि यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाल्यास हा भत्ता 53 टक्क्यांवर जाणार आहे.