7th Pay Commission HRA : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शन धारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत भत्ता नुकताच वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% केला आहे.
ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 50% झाला असल्याने त्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे.
महागाई भत्ता म्हणजेच डीए 50% पेक्षा अधिक झाल्यास HRA म्हणजेच घरभाडे भत्ता वाढवण्याची तरतूद आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने वित्त विभागाचा शासन निर्णय जारी केला आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने काढला आहे. या शासन निर्णयात घरभाडे भत्ता कधी-कधी वाढवला जाणार यासंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या सदर शासन निर्णयानुसार, एक्स, वाय आणि झेड श्रेणी शहरांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे किमान 5 हजार 400, 3 हजार 600 आणि 1 हजार 800 रुपये का घर भाडे भत्ता दिला जाणार आहे.
यामध्ये सातवा वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्ता ज्यावेळी 25% क्रॉस होईल त्यावेळी एक्स, वाय आणि झेड श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27%, 18% व 9% दराने घर भाडे भत्ता मंजूर केला जाईल असे शासन निर्णयात म्हटले होते.
यानुसार जेव्हा राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 25% क्रॉस झाला होता तेव्हा कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्त्याचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
तसेच जेव्हा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल त्यावेळी एक्स, वाय आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30%, 20% आणि 10% दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे देखील या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जानेवारी 2024 पासून 50% झाला आहे. यामुळे आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव घर भाडे भत्त्याचा देखील लाभ मिळणार आहे.
2019 च्या या शासन निर्णयानुसार लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे. एकंदरीत महागाई भत्ता 50% झाला असल्याने आता राज्यातील कर्मचाऱ्यांना इतरही अनेक लाभ मंजूर होणार आहेत.