7th Pay Commission : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात घेण्यात आला होता. दरम्यान, आता जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जात असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जातो. जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुधारित होत असतो.
यावेळी देखील ऑक्टोबर महिन्यातच जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रातील सरकारकडून निर्गमित केला जाणार असा दावा होत आहे. मात्र महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो.
जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार हे जानेवारी ते जून 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या महागाई भत्त्याच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे. आतापर्यंत जानेवारी ते मे म्हणजेच पाच महिन्यांची महागाई भत्त्याची आकडेवारी समोर आली आहे.
यातील मे महिन्याची आकडेवारी नुकतीच हाती आली आहे. मे 2024 ची आकडेवारी नुकतीच हाती आली असून यामध्ये AICPI निर्देशांक 139.9 अंकांवर पोहोचला असल्याचे जाहीर झाले आहे. या निर्देशांकामध्ये यावेळी फक्त 0.5 अंकांची वाढ दिसून आली आहे.
या आधारे महागाई भत्त्याची गणना देखील फक्त ५२.९१ टक्के एवढी झाली आहे. म्हणजे हा काउंट संपूर्ण 53% देखील झालेला नाही. पण तरीही ही गणना 53 टक्के अशीच काउंट केली जाणार आहे. दरम्यान, आणखी एक महिन्याचा डेटा येणे बाकी आहे.
मात्र, जून महिन्याच्या निर्देशांकामध्ये देखील फारशी मोठी वाढ होणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जून महिन्याच्या निर्देशांकामध्ये देखील 0.5 टक्के एवढी वाढ होणे अपेक्षित आहे. अर्थातच जुलै 2024 पासून महागाई भत्ता हा तीन टक्क्यांनीच वाढणार आहे.
म्हणजेच महागाई भत्ता 53 टक्क्यांवर पोहोचणार असे बोलले जात आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून महागाई भत्ता सतत चार टक्क्यांनी वाढवला जात होता. यामुळे यावेळी देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होती.
मात्र सध्याची आकडेवारी पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांची ही आशा यावेळी पूर्ण होणार नाही असे भासत आहे. कारण की जुलै महिन्यापासून चार टक्क्यांऐवजी फक्त तीन टक्के एवढीच महागाई भत्ता वाढ होऊ शकते असे चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे.