7th Pay Commission : नुकत्याच 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. यापैकी 4 राज्यातील निवडणुकांचा काल अर्थातच 3 डिसेंबरला निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. या निकालात भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने पूर्ण बहुमत मिळवले आहे. यामुळे आता या संबंधित राज्यांमध्ये डबल इंजिन सरकार कार्यरत होणार आहे. तर तेलंगाना या राज्यात काँग्रेसने बाजी मारली आहे.
तसेच आज अर्थातच चार डिसेंबरला मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जानेवारी 2024 च्या महागाई भत्ता वाढीचा नवा आकडा समोर आला आहे.
खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार ठरवला जातो. हा भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात यामध्ये सुधारणा होत असते.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे. सध्या 46 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात आहे. तसेच आता जानेवारी 2024 पासून यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरवला जाणार आहे.
यानुसार जानेवारीत महागाई भत्ता 51 टक्क्यांवर जाणार असा कयास बांधला जात आहे. आतापर्यंत आलेल्या AICPI आकडेवारीनुसार महागाई भत्ता ४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीत, निर्देशांक क्रमांक 138.4 अंकांवर पोहोचला आहे.
यामध्ये 0.9 अंकांची झेप दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्याची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी येणे बाकी आहे. सध्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 साठी AICPI निर्देशांक जारी करण्यात आले आहेत.
सध्या निर्देशांक 138.4 अंकांवर आहे, तर महागाई भत्ता स्कोअर 49.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 50 टक्क्यांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. यानंतर डिसेंबरमध्येही तो 0.54 अंकांच्या उसळीसह 51 टक्क्यांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२३ चे AICPI निर्देशांक आल्यानंतरच, एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम होणार आहे.पण सध्याच्या या आकडेवारीनुसार आणि ट्रेंड पाहता महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.
म्हणजे जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 51% एवढा होईल असा अंदाज बांधला जात आहे. असे झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे संबंधित नोकरदार मंडळीच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.