7th Pay Commission Marathi News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत रुजू असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणूकां डोळ्यापुढे ठेवून केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे.
त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के एवढा झाला आहे. आधी हा महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता. अर्थातच यामध्ये चार टक्क्यांची वाढ झालेली आहे.
विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. परंतु याचा रोखीने लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे, अर्थात जे वेतन एप्रिल महिन्यात हातात येईल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
तसेच महागाई भत्ता वाढीबरोबरच महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकाचे रक्कम यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनात समाविष्ट केली जाणार आहे.
दरम्यान केंद्रातील मोदी सरकारच्या धर्तीवर आता वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार देखील राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी देखील महागाई भत्ता वाढीची घोषणा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
विशेष म्हणजे ही घोषणा येत्या सोमवारी किंवा मंगळवारी होणाऱ्या राज्य कॅबिनेटच्या बैठकीत केली जाणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच वर्तमान शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीची भेट देणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणेच 46 टक्के एवढा आहे.
आता यामध्ये आणखी चार टक्के वाढ होईल आणि त्यांचा देखील महागाई भत्ता 50% एवढा होण्याची शक्यता आहे. यामुळे होळी सणाच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.