7th Pay Commission News : येत्या दोन महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार आहे. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच सन 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी खुशखबर मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नवीन वर्षात 50 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यासोबतच नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता वाढीचा देखील लाभ मिळणार आहे.
खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जुलै 2023 पासून हा महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. या आधी महागाई भत्ता 42 टक्के एवढा होता.
म्हणजे यामध्ये चार टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. यानुसार महागाई भत्ता 46% एवढा झाला आहे. विशेष बाब अशी की जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% एवढा होईल असा दावा केला जात आहे.
याव्यतिरिक्त घरभाडे भत्ता देखील तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. दरम्यान आज आपण घरभाडे भत्ता केव्हा वाढेल आणि यामध्ये किती वाढ होईल याबाबत जाणून घेणार आहोत.
केव्हा वाढणार घरभाडे भत्ता
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर ज्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होईल त्यावेळी घर भाडे भत्ता सुधारित केला जाणार आहे. यामुळे नवीन वर्षात घरभाडे भत्ता वाढवला जाणार आहे.
घर भाडे भत्ता अर्थातच एचआरए तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. खरं तर घर भाडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरानुसार दिला जात आहे.
वेगवेगळ्या शहरातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या घरभाडे भत्ता पुरवला जात आहे. यासाठी एक्स, वाय आणि झेड अशा तीन कॅटेगिरीमध्ये कर्मचाऱ्यांना डिवाइड करण्यात आले आहे.
यानुसार, सध्या एक्स श्रेणी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 27%, वाय श्रेणी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 टक्के आणि झेड श्रेणीअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घरभाडे भत्ता म्हणजे HRA दिला जात आहे. मात्र आता या घरभाडे भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा HRA 30%, वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा एच आर ए 20% आणि झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा एच आर ए 10 टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नवीन वर्षात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.