7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर सरकारी पगारदार लोकांसाठी मार्च महिना खूपच छान राहिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला आहे.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. आता महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे फक्त महागाई भत्ताच वाढला आहे असे नाही तर इतरही अनेक भत्ते वाढले आहे.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे. महागाई भत्ता, एचआरए यात वाढ झाली आहे. विशेष बाब अशी की, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फक्त हे दोन 2 भत्ते वाढलेत असे नाही तर आणखी 8 प्रकारचे भत्ते वाढले आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महागाई भत्ता आणि एचआरए व्यतिरिक्त असे 8 प्रकारचे भत्ते आहेत ज्याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. दरम्यान, महागाई भत्ता वाढ झाल्यानंतर आता हे भत्तेही वाढले आहेत.
ज्यावेळी महागाई भत्ता 50% क्रॉस होईल त्यावेळी घर भाडे भत्तासहित इतर अन्य भत्ते वाढवण्याची तरतूद होते. त्यानुसार आता हे सगळे भत्ते वाढवण्यात आले आहेत. आता आपण केंद्र शासनाने कोणकोणते भत्ते वाढवले आहेत, हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कोणकोणते भत्ते वाढलेत
महागाई भत्ता : DA हा 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. त्याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारांसोबत मिळणार आहे. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे.
घरभाडे भत्ता (HRA) : आधी एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के HRA मिळतं होता. आता HRA अनुक्रमे 30, 20 आणि 10% एवढा बनला आहे. म्हणजे यात 1-3% टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे.
- मुलांचा शिक्षण भत्ता (CAA)
- बालसंगोपन विशेष भत्ता
- वसतिगृह अनुदान
- हस्तांतरणावर TA (वैयक्तिक प्रभावांची वाहतूक)
- उपदान मर्यादा
- ड्रेस भत्ता
- स्वतःच्या वाहतुकीसाठी मायलेज भत्ता
- दैनिक भत्ता