7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच एक मोठी भेट दिली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सध्याच्या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुका घेणार आहे.
कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे.
या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता.
यामध्ये आता केंद्रातील मोदी सरकारने आणखी चार टक्क्यांची वाढ केली आहे. अर्थातच जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे.
याचा रोखीने लाभ मात्र मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच कर्मचाऱ्यांच्या हातात एप्रिल महिन्यात जे वेतन येईल त्या वेतनासोबत देण्याचा निर्णय झालेला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे. यामुळे होळी सणाच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ या ठिकाणी होणार आहे.
परिणामी सदर नोकरदार मंडळीच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेऊ शकते अशी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 9000 पर्यंतची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के क्रॉस झाला असल्याने आता हा महागाई भत्ता शून्य होईल आणि महागाई भत्ता वाढीची रक्कम मुळ वेतनात जमा होईल असा दावा केला जात आहे.
ज्यावेळी पुढील महागाई भत्ता वाढ लागू होईल अर्थातच जुलै 2024 पासूनच्या महागाई भत्ता वाढीपासून महागाई भत्ता 0 होईल आणि पुढील महागाई भत्ता वाढ लागू केली जाईल असा दावा होत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात 9000 ची वाढ होण्याची शक्यता आहे.