7th Pay Commission : राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच शिंदे सरकार मोठी भेट देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरे तर आगामी वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. शिवाय लोकसभेच्या देखील निवडणुका रंगणार आहेत. एकूणच काय की 2024 हे वर्ष इलेक्शन इयर म्हणून ओळखले जाणार आहे.
दरम्यान इलेक्शन मध्ये आपलाच विजयाचा गुलाल उधळला पाहिजे म्हणून सत्ताधाऱ्यांकडून तसेच विपक्ष्यातील नेत्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच मोठ्या जोरात वाजू लागले आहेत.
सरकारकडून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध घोषणा दिल्या जात आहेत. अशातच आता वर्तमान शिंदे सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुश करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेमध्ये लवकरच मोठी वाढ होणार आहे.
खरंतर, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नुकतीच राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती.
या बैठकीत मनोज सौनिक यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. सौनिक यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षे करणे बाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सौनिक यांनी यावेळी सांगितले आहे.
यासोबतच ग्रॅच्युईटीची रक्कम 6 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. सौनिक यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांची ग्रॅच्यूटीची रक्कम 14 लाखावरून वाढवून वीस लाख करणे बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडून मागितला गेला आहे.
यामुळे राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ग्रॅच्युएटीच्या रकमेत वाढ केली जाऊ शकते अस मत व्यक्त केले जात आहे.