7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
कारण की, केंद्र शासन लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे.
सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा आहे. महागाई भत्ता अर्थातच डीए हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जात असतो.
यानुसार जुलै 2023 पासून सुधारित करण्यात आलेला महागाई भत्ता हा 46% एवढा आहे. आधी हा भत्ता 42% एवढा होता. म्हणजेच यामध्ये चार टक्क्यांची वाढ झालेली आहे. आता, जानेवारी 2024 पासून हा भत्ता पुन्हा एकदा सुधारित केला जाईल आणि यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.
अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता लवकरच 50% होणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रातील मोदी सरकार 20 मार्च 2024 पर्यंत कधीही घेऊ शकते असे बोलले जात आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये तर 20 मार्चला केंद्रीय कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक होईल आणि या बैठकीतच महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब केले जाईल असा मोठा दावा देखील करण्यात आला आहे.
परंतु, याबाबत केंद्रातील मोदी सरकारने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे, याबाबतचा निर्णय केव्हा होणार ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
तथापि, जर याबाबतचा निर्णय या चालू महिन्यातच झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जे वेतन एप्रिल महिन्यात हातात येईल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि दोन महिन्याच्या महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ दिला जाणार आहे.
त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे आणि त्यांना होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट मिळणार आहे. विशेष म्हणजे फक्त महागाई भत्ताच वाढेल असे नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 9 भत्ते वाढवले जाणार असे बोलले जात आहे.
घरभाडे भत्ता (HRA), मुलांचा शिक्षण भत्ता, बाल संगोपनासाठी विशेष भत्ता, वसतिगृह अनुदान, हस्तांतरणावर टी.ए, उपदान मर्यादा, ड्रेस भत्ता, वाहतुकीसाठीचा भत्ता, दैनिक भत्ता हे भत्ते वाढणार आहेत.