7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जसं की आपण पाहतच आहात की उद्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पाच टप्प्यात पूर्ण झाली आहे.
मात्र देशातील मतदानाची प्रक्रिया एकूण सात टप्प्यात पूर्ण होणार असून उद्या अर्थातच 25 मे 2024 ला मतदानाचा सहावा टप्पा पूर्ण होणार आहे. यानंतर सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर चार जून 2024 ला मतदानाचा निकाल लागणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असा अंदाज आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
मात्र लवकरच हा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. अर्थातच महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे.
जून महिन्याच्या पगारासोबतच म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जो पगार मिळेल त्यासोबत वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे. तथापि, ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू केली जाणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे.
जानेवारी ते मे या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. निश्चितच, जानेवारी 2024 पासून 4% महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला तर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना तथा पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.