7th Pay Commission : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असून 4 जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या या धामधुमीत राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
जर तुम्हीही पुणे महापालिकामध्ये सेवा देत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी पुणे महापालिकेमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या सदर कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र तथा राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे.
केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला.
मात्र या सदर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी एकूण पाच टप्प्यात देण्याचे जाहीर करण्यात आले. यानुसार आत्तापर्यंत या थकबाकीचे दोन हप्ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
दरम्यान पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे. यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखा विभागाने प्रक्रिया सुरू केली आहे.
सातवा वेतन आयोगाची तिसऱ्या हप्त्याची थकबाकी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची बिले तपासून त्यासंबंधीची कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने निर्गमित केलेले आहेत.
त्यामुळे पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे. निश्चितच ही रक्कम संबंधित नोकरदार मंडळीला प्राप्त झाली तर त्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात समोर आलेली ही अपडेट या सदर कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची आहे. तथापि ही रक्कम लवकरात लवकर पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणे आवश्यक आहे.