7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर, प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचारी असो किंवा सरकारी कर्मचारी असो या कर्मचाऱ्यांना विविध भत्त्याचा लाभ मिळत असतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत बोलायचं झालं तर त्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता अशा प्रकारचे विविध भत्ते दिले जात असतात.
दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2024 हा महिना खूपच फायदेशीर ठरला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने त्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
जानेवारी 2024 पासून हा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे. मार्च महिन्याच्या पगारासोबत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील त्यांना मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे फक्त महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे असे नाही तर महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता सुद्धा वाढवला जाईल अशी देखील तरतूद सातवा वेतन आयोग अंतर्गत करून देण्यात आली आहे. यानुसार घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे.
किती वाढणार घरभाडे भत्ता
सध्या स्थितीला शहरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता दिला जात आहे. यामध्ये एक्स कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना 9% एवढा घर भाडे भत्ता मिळत आहे. आता मात्र घर भाडे भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे.
आता घर भाडे भत्ता एक्स, वाय आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के एवढा मिळणार आहे. याचा लाभ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे. यामुळे निश्चितच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा या ठिकाणी मिळणार आहे.
मार्च महिन्याच्या पगारासोबत हे सर्व लाभ आणि महागाई भत्ता फरक तथा इतर भत्ता फरक रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याने मार्च महिन्याचा पगार त्यांच्यासाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. फक्त महागाई भत्ता आणि घर भाडे भत्ताच वाढणार नाही तर इतरही अनेक भत्ते कर्मचाऱ्यांचे वाढणार आहेत.
कोण कोणते भत्ते वाढणार
महागाई भत्ता (DA)
घरभाडे भत्ता (HRA)
मुलांचा शिक्षण भत्ता (CAA)
बालसंगोपन विशेष भत्ता
वसतिगृह अनुदान
हस्तांतरणावर टी.ए
उपदान मर्यादा
ड्रेस भत्ता
स्वतःच्या वाहतुकीसाठी मायलेज भत्ता
दैनिक भत्ता