7th Pay Commission : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे भारतीय निवडणूक आयोग आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका घेणार आहे. यासाठी लवकरच मतदानाच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यात की लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे.
अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 50 टक्के एवढा झाला आहे.
म्हणजेच महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला आहे. परिणामी सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून होळी सणाच्या निमित्ताने ही त्यांच्यासाठी मोठी भेट ठरली आहे. हा सदर लागू करण्यात आलेला महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून मिळणार आहे.
मात्र याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जे वेतन एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्यासोबत मिळणार आहे.
साहजिकच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार आणि त्यांना दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम किती मिळणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महागाई भत्ता वाढीमुळे पगार किती वाढणार
महागाई भत्ता 50% झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. समजा एका केंद्रीय कर्मचाऱ्याचे मुळे वेतन हे 50,000 रुपये ऐवढे आहे.
आता या कर्मचाऱ्यांचा पगारात डीए वाढीनंतर किती वाढ होणार ? हे जाणून घेण्यासाठी एका सूत्राचा वापर करावा लागणार आहे. या सूत्रानुसार, 50,000 X 4 / 100 = 2000 रुपये एवढी पगारात वाढ होणार आहे.
महागाई भत्ता फरक किती मिळणार ?
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 50 हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात महागाई भत्ता वाढीनंतर दोन हजाराची वाढ होणार आहे. अशा तऱ्हेने सदर कर्मचाऱ्याला दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणून चार हजार रुपये मिळणार आहेत.
यामध्ये जानेवारी महिन्याचे 2000 आणि फेब्रुवारी महिन्याचे 2000 या महागाई भत्ता फरकाचा समावेश राहणार आहे. यामुळे निश्चितच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा होळीचा सण गोड होईल अशी आशा आहे.