7th Pay Commission : देशात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आधी या नोकरदार मंडळीला 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता.
मात्र केंद्रातील मोदी सरकारने यामध्ये पुन्हा एकदा चार टक्क्यांची वाढ केली आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांचा ट्रेंड पाहता यावेळी देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनीच वाढणार असे सांगितले जात होते. झाले देखील तसेच, केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्ता म्हणजेच डीए पुन्हा चार टक्क्यांनी वाढवला आहे.
म्हणजेच आता या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झालेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील चार टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय झालेला आहे.
आधी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र जानेवारी 2024 पासून त्यांना देखील 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या हातात एप्रिल महिन्यात जो पगार येईल त्या पगारांसोबत मिळणार आहे.
महागाई भत्ता वाढ जानेवारीपासून लागू असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील सदर कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे.
त्यांना देखील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम आणि वाढीव महागाई भत्ता लाभ मार्च महिन्याचा पगार सोबत दिला जाणार आहे. तथापि, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही वाढलेला नाही.
आता तर देशात आचारसंहिता लागू आहे यामुळे निवडणुकीनंतरच हा महागाई भत्ता वाढेल असे जाणकार लोकांनी म्हटले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची आशा होती मात्र वर्तमान शिंदे सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला गेला नाहीये मात्र इतर राज्यातील राज्य शासनाने तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या राज्यात वाढला DA ?
हरियाणा आणि बिहार राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा जानेवारी महिन्यापासूनच महागाई भत्ता वाढ लागू राहणार आहे.
छत्तीसगड राज्य शासनाने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे. मध्यप्रदेश मधील राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र आता तेथील सरकारने यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.