7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत तसेच सणासुदीचा देखील हंगाम सुरू आहे.
दरम्यान या सणासुदीच्या काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. खरेतर सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यंदा देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून यातील तीन टप्प्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
उर्वरित चार टप्यांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के एवढा केला होता.
जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्के एवढा करण्यात आला आहे. दरम्यान महागाई भत्ता 50 टक्क्यावर पोहोचल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी संदर्भात. महागाई भत्त्यासह कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. आज आपण सरकारने कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी किती टक्के वाढवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांची उपदानाची कमाल रक्कम वाढवण्यात आली आहे. डीएमध्ये 50 टक्के वाढ करण्याबरोबरच सरकारने सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदान (ग्रॅच्युइटी) ची मर्यादा देखील 25 टक्क्यांनी वाढवली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, 1 जानेवारी 2024 पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल 25 लाख रुपये एवढी ग्रॅच्युइटी मिळू शकणार आहे.
आतापर्यंत ही रक्कम 20 लाख एवढी होती. यामध्ये पाच लाख रुपयांची अर्थातच 25% ची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. खरंतर येत्या 2 दिवसांनी अर्थातच 10 मेला अक्षय तृतीयाचा मोठा सण येणार आहे.
याआधीच मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम वाढवण्याचा निर्णय केंद्रातील सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे सदर नोकरदार मंडळीला ही अक्षय तृतीयाची एक भेट असल्याचे बोलले जात आहे.