7th Pay Commission : केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सोबतच पेन्शनधारकांचा महागाई सवलत दर म्हणजेच DR सुद्धा वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
हा भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता केंद्रीय पेन्शनधारकांना देखील 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
दरम्यान हा सुधारित महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू राहणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाने 13 मार्च 2024 ला एक महत्वाचे कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे. यानुसार, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग (DOPPW) अनेक श्रेणींमध्ये हा वाढीव DR लागू करणार आहे.
कोणत्या पेन्शन धारकांचा DR वाढणार आहे
PSU/स्वायत्त संस्थांमधील केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसह नागरी केंद्र सरकारचे पेन्शनधारक/कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक यांचा महागाई सवलत भत्ता वाढणार आहे.
सशस्त्र दल पेन्शनधारक किंवा कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक आणि नागरी निवृत्तीवेतनधारक किंवा कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक. यांना संरक्षण सेवांमधून पैसे दिले जातात.
ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनर्स
रेल्वे/कौटुंबिक पेन्शनधारक
बर्मा नागरी पेन्शनधारक/कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक, तसेच निवृत्तीवेतनधारक/ बर्मा/पाकिस्तानमधील विस्थापित सरकारी निवृत्तीवेतनधारकांचे कुटुंब
पगारात कितीने वाढ होणार ?
पेन्शन धारकांचा महागाई भत्ता अर्थातच महागाई सवलत वाढल्यानंतर त्यांच्या पगारात अर्थातच निवृत्तीवेतनात देखील वाढ होणार आहे. आता आपण महागाई सवलत वाढल्यानंतर पेन्शन धारकांचा पगार कितीने वाढणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या एका पेन्शनधारकाला मूळ पेन्शन म्हणून दरमहा ४०,१०० रुपये मिळत आहेत.
अशा परिस्थितीत सदर पेन्शन धारकाला वाढीव महागाई भत्ता नंतर किती पेन्शन मिळणार हे थोडक्यात पाहणार आहोत. या सदर पेन्शन धारकाला 46 टक्के महागाई सवलतीनुसार सध्या 18,446 रुपये डीआर म्हणून मिळतं आहेत. आता नवीन वाढीनंतर, या पेन्शन धारकाला दरमहा DR म्हणून 20,050 रुपये मिळतील.
म्हणजे त्याच्या मासिक पेन्शनमध्ये 1,604 रुपयांची वाढ होणार आहे. निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना लवकरच वाढीव महागाई सवलत मिळणार आहे कारण DOPPW ने बँकांना पुढील आदेशाची वाट न पाहता पेन्शनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना DR पेमेंट सुरू करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत.