7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. खरंतर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून दरवर्षी महागाई भत्ता सुधारित केला जात असतो.
मात्र याचा प्रत्यक्षात लाभ हा उशिराने मिळतो. जसे की जानेवारी महिन्यापासून वाढणारा महागाई भत्ता हा नेहमी मार्च महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना दिला जातो. तसेच जुलै महिन्यापासून वाहणारा महागाई भत्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना दिला जात असतो.
पहिल्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो अन मग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळत असतो. मात्र लाभ उशिराने मिळत असला तरी देखील महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासूनच सुधारित होत असतो.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला आहे. जानेवारी 2024 पासून ही वाढ लागू राहणार आहे. याचा रोख लाभ मात्र जुलै महिन्याच्या पगारांसोबत मिळणार आहे.
अर्थातच जानेवारी महिन्यापासून हा लाभ लागू असल्याने जानेवारी ते जून या कालावधी मधील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
जुलै महिन्यापासून किती वाढणार महागाई भत्ता
महागाई भत्ता वाढ ही ए आय सी पी आय च्या आकडेवारीनुसार ठरत असते. जुलै 2024 पासून वाढणारा महागाई भत्ता हा जानेवारी ते जून 2024 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे. सध्या स्थितीला जानेवारी ते मे या कालावधीमधील एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे.
जून महिन्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. पण, लवकरच ही आकडेवारी समोर येणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या अखेरीस ही आकडेवारी समोर येईल आणि तदनंतर अखेरकार जुलै 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
तथापि, आत्तापर्यंतची आकडेवारी पाहिली असता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे दिसत आहे. म्हणजे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणार आहे.
जुलै 2024 पासून महागाई भत्ता 53 टक्क्यांवर जाईल असा विश्वास जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे. खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना किमान चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार अशी आशा होती.
मात्र सध्याची आकडेवारी पाहिली असता यामध्ये यावेळी चार टक्के वाढ होणार नाही असे दिसत आहे. तथापि, तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याने निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल यात शन्काचं नाही.