7th Pay Commission : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नवरात्र उत्सवात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा निर्णय झाला आहे. यानुसार महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे. आधी हा भत्ता 42 टक्के होता. त्यापूर्वी DA 38% होता.
दरम्यान केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2023 पासून वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध राज्य शासनाने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांचा देखील डीए वाढविण्यात आला आहे. पेन्शन धारकांचा महागाई भत्ता देखील वाढला आहे.
दरम्यान जानेवारी 2024 पासून आणखी महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो.
जानेवारी आणि जुलै महिन्यापासून यामध्ये वाढ होत असते. म्हणजेच आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
पण यावेळी महागाई भत्ता म्हणजेच डीए किती वाढणार? हा मोठा प्रश्न आहे. आत्तापर्यंतचा महागाई भत्ता वाढीचा ट्रेंड पाहिला तर यामध्ये चार टक्के वाढ होणार असे सांगितले जात आहे.
तर सध्याची all India consumer price index ची आकडेवारी पाहता यामध्ये पाच टक्के वाढ होईल असे काही जाणकार लोकांनी सांगितले आहे. यामुळे जानेवारी 2024 पासून डीए चार टक्क्यांनी वाढणार की पाच टक्क्यांनी हा मोठा सवाल आहे.
AICPI ची आकडेवारी काय सांगतेय
मीडिया रिपोर्ट नुसार, लेबर ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावर एप्रिल 2023 पासून महागाई भत्त्यात झालेला बदल अपडेट करण्यात आलेला नाही. यामुळे जानेवारी 2024 पासून नेमका महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होत नाहीये.
पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर DA पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्याचा 46% DA हा 51 टक्क्यांवर जाणार असा अंदाज आहे.
तथापि याबाबत शासनाच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच योग्य ती माहिती समोर येणार आहे. यामुळे जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता किती वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.