7th Pay Commission : खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी असो किंवा सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेले कर्मचारी नोकरदार वर्गात प्रमोशनबाबत कायमच चर्चा पाहायला मिळतात. नोकरदारांसाठी प्रमोशन हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे एका ठराविक काळानंतर प्रमोशन अर्थातच पदोन्नती मिळायला पाहिजे अशी नोकरदार वर्गाची इच्छा असते.
खाजगी क्षेत्रात देखील आणि सरकारी क्षेत्रातील नोकरदार वर्गाकडून प्रमोशनची आतुरतेने वाट पाहिली जाते. दरम्यान याच अतिशय जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना आता प्रमोशनचा लाभ दिला जाणार आहे.
कारण की केंद्र शासनाने काही कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन बाबत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे आज आपण केंद्र शासनाने कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे आणि याचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी केल्यात सुधारणा
हाती आलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि सैनिकांसाठी असलेल्या पदोन्नतीच्या नियमांमध्ये किमान पात्रतेबाबत सुधारणा केली आहे. यानुसार सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या संरक्षण विभागातील कर्मचारी आणि सैनिकांना या सुधारणा लागू राहणार आहेत.
यासाठी 22 ऑगस्ट 2023 रोजी सविस्तर अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार प्रमोशन मिळवण्यासाठी किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यानुसार वेगवेगळ्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. यानुसार स्तर एक ते दोन अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळवण्यासाठी किमान तीन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
स्तर एक ते तीनसाठी देखील तीन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. स्तर 2 ते 4 साठी तीन वर्ष ते आठ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच स्तर 17 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना एक वर्ष ते बारा वर्ष पर्यंतच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
दरम्यान या अधिसूचनेत ही सुधारणा तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच या पात्रतेत जे कर्मचारी फिट बसत असतील त्यांना लगेचच पदोन्नती दिली जाणार आहे. मात्र पदोन्नती बाबत या अधिसूचनेत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. म्हणजेच कर्मचाऱ्यांना कोणत्या पदावर बढती मिळेल या संदर्भात यामध्ये माहिती दिलेली नाही.