7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. कारण की, राज्यातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण आरक्षण मोठा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे.
काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. काल राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झाला.
या निर्णयानुसार आता राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. 30 जून 2016 पासून पदोन्नती साठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. यामुळे या सदर राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सदर नोकरदार मंडळीला गट अ पासून ते गट ड पर्यंतच्या पदोन्नती मध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय काल झाला आहे. याचा लाभ हा काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळणार आहे.
म्हणजेच ३० जून २०१६ पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल, त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरीत्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.
यामुळे राज्यातील दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. या सदर नोकरदार मंडळीला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय घेतला असून या निर्णयाचा राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. यामुळे सदर निर्णयाचे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.
तथापि या अंतर्गत मिळणाऱ्या पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होणार आहे. नक्कीच, या संबंधित निर्णयाचा राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
खरे तर येत्या काही दिवसांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारला मोठा फटका बसला आहे.
यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध घटकांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.