8th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पुन्हा एकदा आठवा वेतन आयोगाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चा रंगण्याचे कारण असे की सध्याचा सातवा वेतन आयोग लागू होऊन आता जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण होत आला आहे. यामुळे नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.
वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झाला होता आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी नवीन आयोग कर्मचाऱ्यांसाठी बहाल करण्यात आला आहे.
सध्याच्या सातवा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर हा सध्याचा सातवा वेतन आयोग 28 फेब्रुवारी 2014 ला स्थापित झाला होता. तेथून मग दोन वर्षांनी हा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी बहाल करण्यात आला. एक जानेवारी 2016 पासून हा वर्तमान वेतन आयोग लागू झाला आहे.
दरम्यान आत्तापर्यंत प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला असल्याने आगामी आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. मात्र, यासाठी च्या समितीची स्थापना म्हणजेचं आठवा वेतन आयोगाची स्थापना ही 2024 अखेरपर्यंत होणे गरजेचे आहे.
यानुसार आता आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 23 जुलैला तिसऱ्यांदा सरकार स्थापित झाल्यानंतर मोदी सरकार आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत.
या आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्पात मोदी सरकार अनेक मोठमोठ्या घोषणा करणार असा दावा केला जात आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग संदर्भात केंद्रातील सरकार सकारात्मक निर्णय घेणार आणि आठवा वेतन आयोगाची स्थापना बाबत घोषणा होणार अशी अपेक्षा आहे.
अशा परिस्थितीत आज आपण जर समजा येत्या अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाली आणि एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लेव्हल – 7 वा वेतन – 8 वा वेतन
1 – 18,000 – 21,600 रू.
2 – 19,900 – 23,880 रू.
3 – 21,700 – 26,040 रू.
4 – 25,500 – 30,600 रू.
5 – 29,200 – 35,040 रू.
15 – 1,82,200 – 2,18,400 रू.
16 – 2,05,400 – 2,46,480 रू.
17 – 2,25,000 – 2,70,000 रू
18 – 2,50,000 – 3,00,000 रू.