8th Pay Commission : तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत आहात का ? तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत वेतन उपलब्ध होत आहे.
हा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. अर्थातच आता सध्याचा वेतन आयोग लागू होऊन जवळपास आठ वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे.
आणखी दोन वर्षात या वेतन आयोगाला एक दशक म्हणजेच दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत आता सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचे वेध लागले आहे.
नवीन आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार हा सवाल सदर नोकरदार मंडळीच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
खरेतर मीडिया रिपोर्ट मध्ये अर्थसंकल्प 2024-25 मध्ये आठवा वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा होऊ शकते असा दावा केला जात होता.
मात्र अर्थसंकल्पात याबाबत सरकारने कोणतीच माहिती दिली नाही. आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत शासनाने काहीच म्हटले नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला.
यामुळे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनी आठवा वेतन आयोगाबाबत सरकारची भूमिका काय आहे आणि आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार याबाबत एक प्रश्न उपस्थित केला होता. यावर सरकारने आठवा वेतन आयोगाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांचा प्रश्न
राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनी राज्यसभेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचा दावा करणारे सरकार गेल्या काही वर्षांपासून महागाईचा सामना करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी आठवा वेतन आयोग का स्थापन करत नाही ? असा सवाल उपस्थित केला होता.
यावर उत्तर देताना सरकारकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकार नवीन वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या परिस्थितीत नाही.
हेच कारण आहे की आठवा वेतन आयोग लागू करणे सरकारला जमलेले नाही. तसेच आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाहीये असे देखील चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.