Aadhar Card News : भारतात आधार आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आधार कार्ड हा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. हे भारतातील सर्वात महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण की, अगदी शाळेत ऍडमिशन घेण्यापासून ते बँकेत अकाउंट ओपन करण्यापर्यंत सर्वत्र या डॉक्युमेंटचा वापर होतो.
या कागदपत्राविना भारतात कोणतेच शासकीय आणि निम शासकीय काम केले जाऊ शकत नाही. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आले आहे.
आपल्या देशात साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असेल तरी देखील आधार कार्ड लागते. सध्या महाराष्ट्रात ज्या योजनेची चर्चा आहे त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी देखील आधार कार्ड अनिवार्य आहे.
लाडकी बहीण योजनेसारख्या विविध योजनांच्या लाभासाठी या डॉक्युमेंटची गरज भासते. प्रत्येकच कामांमध्ये आधार कार्डचा उपयोग होत असल्याने याचा गैरवापर होण्याची देखील भीती असते. विशेषतः मयत व्यक्तींच्या आधार कार्डचा गैरवापर होण्याची भीती सर्वात जास्त असते.
अशा परिस्थितीत, मयत व्यक्तींच्या आधार कार्डचे काय होते, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आधार कार्डचे काय केले पाहिजे यासंदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मयत व्यक्तीच्या आधार कार्डचे काय होते ?
खरंतर, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे आधार कार्ड रद्द केले जाऊ शकत नाही. मयत व्यक्तीच आधार कार्ड रद्द करण्याबाबत सरकारने अजून कोणतेच नियम तयार केलेले नाहीत.
मात्र व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड लॉक केले जाऊ शकते. यामुळे आता आपण आधार कार्ड लॉक करण्याची प्रोसेस कशी आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही सदर मयत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करू शकता जेणेकरून त्या आधार कार्डचा भविष्यात गैरवापर होणार नाही. विशेष म्हणजे आधार कार्ड हे घरबसल्या तुमच्या मोबाईलवरूनच लॉक करता येते.
आधार कार्ड कसे लॉक करणार?
यासाठी आधार कार्ड च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://uidai.gov.in या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर माय आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला आधार सेवा विभागातून आधार लॉक/अनलॉक या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
मग ‘लॉक यूआयडी’ या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक, नाव आणि पिन कोड टाका. यानंतर ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा. आता OTP टाका, यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होणार आहे.