Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, आपल्या भारतात आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्तऐवज आहे जे देशातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक झाले आहे. भारतात कोणतेही शासकीय आणि निमशासकीय काम असेल तरी देखील आधार कार्ड मागितले जाते. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड आवश्यक असते.

सध्या महाराष्ट्रात चर्चेस आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे बनले आहे. खरे पाहता भारतात साध एक सिमकार्ड जरी काढायचे असले तरी देखील आधार कार्ड आवश्यक असते.

Advertisement

जर तुमच्याकडे आधार राहिले नाही तर तुमची सर्व प्रकारची सरकारी आणि खाजगी कामे अडकून राहतील आणि वेळेवर पूर्ण होणार नाहीत. आधार कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून जारी केले जात असते.

दरम्यान या प्राधिकरणाच्या माध्यमातून आधार कार्ड संदर्भात वेगवेगळे नियम देखील बनवले गेले आहेत. ही संस्था अनेक महत्त्वाचे नियम अपडेट सुद्धा करत असते ज्यामुळे करोडो आधार कार्डधारकांवर परिणाम होत असतो. दरम्यान सरकारच्या नवीन नियमानुसार आता 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक झाले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे 14 सप्टेंबर पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. दरम्यान आता आपण ज्या लोकांचे आधार कार्ड दहा वर्षे जुने झाले असेल त्यांनी आधार कार्ड कसे अपडेट करायचे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आधार कार्ड कसे अपडेट करणार?

Advertisement

जर तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने झाले असेल तर तुम्ही ते अपडेट केले पाहिजे. आधार अपडेट करण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यानुसार, कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC वरून आधार कार्ड अपडेट करता येणार आहेत.

यासाठी 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. पण जर तुम्हाला मोफत आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही myAadhaar पोर्टलद्वारे तुमचे आधार मोफत अपडेट करू शकता.

Advertisement

मोफत आधार अपडेट कसे करावे?

जर तुम्हाला एकही रुपया न देता आधार अपडेट करायचे असेल तर यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागणार आहे. आता तुम्हाला आधार क्रमांकाने लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर ‘proceed to update address’ हा पर्याय निवडावा लागेल.

Advertisement

येथे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वन-टाइम पासवर्ड पाठवला जाणार आहे. ज्याची पडताळणी करायची आहे. यानंतर ‘Document Update’ या पर्यायावर क्लिक करा. आवश्यक ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर तपशीलांची पडताळणी करा आणि सबमिट करा. एवढी प्रोसेस केल्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होणार आहे. परंतु मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंतची मुदत आहे.

Advertisement

यानंतर माय आधार पोर्टलवरूनही मोफत आधार अपडेट होणार नाही. म्हणजे 14 सप्टेंबर नंतर सीएससी सेंटरवर जाऊनही आणि माय आधार पोर्टलवर जाऊनहीं आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *