Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे शासकीय कागदपत्र भारतीय नागरिकांचा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून instagram आणि युट्युब सारख्या प्लॅटफॉर्मवर दहा वर्षे जुने आधार कार्ड आता बंद होणार अशा आशयाचे रील्स आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत.
यामुळे आधार कार्ड धारकांमध्ये मोठे भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतात आधार कार्ड हे असे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे ज्याच्या विना कोणतेच काम केले जाऊ शकत नाही. साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असले तरी देखील आधार कार्ड आवश्यक असते.
याशिवाय शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी याचा वापर केला जातो. पॅन कार्ड, रेशन कार्ड, वोटर आयडी कार्ड असे विविध डॉक्युमेंट काढण्यासाठी हे आवश्यक असते.
तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, केवायसी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. अलीकडे आधार कार्डच्या माध्यमातून बँकेतील पैसे देखील काढता येणे शक्य झाले आहे. मोबाईल नंबरला आणि बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक झाले आहे.
अशा परिस्थितीत जर आधार कार्ड बंद पडले तर काय होणार या भीतीने सर्वसामान्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. खरे तर सोशल मीडियामध्ये सध्या 14 जूननंतर दहा वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड बंद होईल असा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत असे म्हटले गेले आहे की ज्यांचे आधार कार्ड दहा वर्षे जुने आहे त्यांनी जर 14 जून पर्यंत आपले आधार अपडेट केले नाही तर त्यांचे आधार बंद होईल असे म्हटले जात आहे. दरम्यान आता याच संदर्भात यूआयडीएआय च्या माध्यमातून स्पष्टीकरण समोर आले आहे.
UIDAI ने ज्या व्यक्तींनी दहा वर्षे जुने आधार कार्ड अपडेट केलेले नसेल त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असे म्हटले आहे. तसेच आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्यासाठी 14 जून 2024 ही शेवटची मुदत आहे.
मात्र असे असले तरी 14 जूनपर्यंत जें नागरिक आपले आधार कार्ड अपडेट करणार नाही त्यांचे आधार बंद होणार नाही. मात्र 14 जून नंतर आधार अपडेट करण्यासाठी चार्जेस द्यावे लागणार आहेत.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जवळील आधार केंद्रावर जावे लागणार आहे किंवा ऑनलाईन देखील आधार अपडेट केले जाऊ शकते. एकंदरीत सध्या सोशल मीडियामध्ये 14 जून नंतर दहा वर्षे जुने आधार कार्ड बंद होईल असा जो दावा केला जात होता तो दावा साफ खोटा आहे.
ज्यांनी दहा वर्षांपासून आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांचे आधार कार्ड 14 जून नंतर बंद होणार नाही. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि ज्यांनी दहा वर्षांपासून आपले आधार कार्ड अपडेट केलेले नसेल त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असेही सांगितले जात आहे.