Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. खरेतर, सध्या सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होत आहे. यामुळे सध्या आधार कार्ड धारकांमध्ये एक भितीचे वातावरण आहे. या न्युजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर लोकांनी त्यांचे आधार कार्ड एक दशकापूर्वी म्हणजे 10 वर्षांपूर्वी बनवले असेल आणि आतापर्यंत त्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर त्यांचे आधार कार्ड हे पुढील महिन्यात बंद होणार आहे.
येत्या 14 जून नंतर असे आधार बेकायदेशीर होणार असा दावा केला जात आहे. पण युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) या दाव्यांचे खंडन केले आहे. प्राधिकरणाने ही बातमी खरी नसल्याचे म्हटले आहे.
यूआयडीएआयने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. प्राधिकरणाने असे काहीही होणार नाही असे स्पष्ट केले आहे. 10 वर्षांनंतरही जें लोक आधार कार्ड अपडेट करणार नाहीत तरी ते अवैध होणार नाही. असे कार्ड 14 जून नंतरही वैध राहणार आहे.
आधार कार्डबाबतच्या या खोट्या बातम्या काही काळापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे समोर आल्या होत्या. खरेतर सरकारने आधार तपशील मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2024 पर्यंत वाढवली आहे.
यापूर्वी ही मुदत १४ मार्च होती, परंतु UIDAI ने मोफत ऑनलाइन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा आता १४ जूनपर्यंत वाढवली आहे. जें 14 जूनपर्यंत आपला आधार क्रमांक ऑनलाइन अपडेट करतील त्यांनाच मोफत अपडेटची सुविधा मिळणार आहे.
पण, जें लोक आधार सेवा केंद्राला भेट देतील आणि त्यांचे आधार कार्ड अपडेट करतील त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. दरम्यान जें लोक 14 जून नंतर आधार अपडेट करतील त्यांना ऑनलाईन आधार अपडेट करण्यासाठी देखील पैसे द्यावे लागणार आहेत.
पण त्यांचे आधार कार्ड वैध राहणार आहे. यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. पण मोफत आधार अपडेट करायचे असेल तर 14 जूनपर्यंत मुदत राहणार आहे.