Aadhar Card Rule : भारतातील नागरिकांसाठी आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. कोणत्याही राज्यातील रहिवासी असो त्याच्यासाठी आधार कार्ड हा सर्वात मोठा ओळखीचा पुरावा असतो. आधार कार्ड विना भारतात कोणतेच शासकीय आणि निमशासकीय काम होऊ शकत नाही.
अहो साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असले तरी देखील आधार कार्ड मागितले जाते. यावरून आपल्याला आधार कार्डची उपयोगिता लक्षात येते. जर एखाद्याकडे हे कार्ड नसेल तर त्याची सर्व कामे ठप्प होऊ शकतात.
शाळेत ऍडमिशन घेण्यापासून ते बँकेत खाते खोलण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्ड लागते. शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड आवश्यक असते. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी देखील आधार कार्ड अनिवार्य आहे.
हेच कारण आहे की सध्या आधार केंद्रांवर लाडक्या बहिणींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महिलावर्ग आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रांवर तोबा गर्दी करत आहेत. काही महिलांच्या आधार कार्डवर नाव, जन्मतारीख यांसारखी महत्त्वाची माहिती चुकीची प्रविष्ट झाली आहे.
यामुळे, ही चूक दुरुस्त करण्यासाठी देखील महिलावर्ग आधार केंद्रावर गर्दी करत आहे. खरेतर, अनेकांचे नाव, लिंग, जन्मतारीख आधारमध्ये चुकीची टाकली गेली आहे. यामुळे अनेकांना ही माहिती चेंज करायची आहे. तसेच काही लोकांचा पत्ता चेंज झाल्यामुळे त्यांना त्यांचा पत्ता बदलायचा आहे.
अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून आधार कार्ड वरील नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता यांसारखी माहिती किती वेळा बदलली जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला जात असे. यामुळे आज आपण याच संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि जन्मतारीख किती वेळा चेंज केली जाऊ शकते?
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, आधार कार्ड धारकांना त्यांचे नाव जास्तीत जास्त 2 वेळा बदलण्याची सुविधा दिली जाते, म्हणजेच नाव फक्त दोनदा बदलता येते. तर लिंग आणि जन्मतारीख आयुष्यात एकदाच बदलता येते.
पण तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील पत्ता कितीही वेळा बदलू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.वीज/पाणी/टेलिफोन बिल, भाडे करार यांसारखे वैध पुरावे देऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पत्ता बदलू शकता किंवा आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन तुम्ही तुमचा पत्ता बदलू शकता.