Aadhar Card Update:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला बँकेत खाते उघडण्यापासून तर अगदी मोबाईलचे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी देखील आधार कार्डची आवश्यकता भासते. याशिवाय अनेक छोटे-मोठ्या गोष्टी तुम्ही आधार कार्ड शिवाय करू शकत नाही इतके हे कागदपत्र महत्त्वाचे आहे.
त्यामुळे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप गरजेचे असते. यामध्ये जन्मतारीख किंवा नावामध्ये किंवा तुमच्या पत्यात थोडी जरी चूक राहिली तरी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक बाबतीत आधार कार्डच्या विषयी काळजी घेणे गरजेचे आहे.
परंतु या आधार कार्डवरील जो आपला फोटो असतो तो आपण जसे हा त्यापेक्षा खूपच काहीतरी वेगळा असा दिसतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तो फोटो आपल्याला हवा तसा चांगला दिसत नाही व त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये येते की आधार कार्ड वरील फोटो बदलावा. परंतु तो कसा बदलावा लागतो ही माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना नसते. त्यामुळे या लेखात आपण या संबंधीची माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी नेमके काय करावे लागेल?
सगळ्यात यामध्ये महत्त्वाचे असे आहे की आधार कार्डचा तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बदलता येणे अशक्य आहे. कारण युआयडीएच्या माध्यमातून आधार वरील फोटो ऑनलाईन बदलण्याची किंवा अपडेट करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला युआयडीएआयच्या uadai.gov.in संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागते व या ठिकाणी जाऊन आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा. त्यानंतर डाउनलोड केलेला हा फॉर्म काळजीपूर्वक भरून घ्यावा व तुमच्या जवळील जे काही आधार केंद्र आहे
त्या ठिकाणी जाऊन तो जमा म्हणजे सबमिट करावा. नंतर त्या ठिकाणी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स तपासले जाईल व कन्फर्मेशन झाल्यानंतर तुमचा दुसरा फोटो त्या ठिकाणी काढला जातो. याकरिता तुम्हाला शंभर रुपये चार्ज लागतो.
नंतर तुमचा नवा फोटो असलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?
1- तुमचे कार्ड किंवा फोटो अपडेट केल्यानंतर तुम्ही तुमचे नवीन आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.
2- याकरिता तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन त्या ठिकाणी माय आधार हा पर्याय निवडावा लागेल.
3- त्यानंतर यामध्ये तुम्हाला डाऊनलोड आधार करण्याचा एक पर्याय दिसतो व त्यावर क्लिक करावे.
4- त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होते व त्यामध्ये विचारलेली सगळी माहिती भरावी.
5- ही माहिती भरून झाल्यानंतर कॅपच्या कोड टाकावा आणि सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे.
6- नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो व तो ओटीपी सांगितलेल्या ठिकाणी नमूद करावा. त्यानंतर मास्क केलेले आधार मिळवण्यासाठी चेक बॉक्स वर क्लिक करावे.
7- त्यानंतर व्हेरिफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक करावे व तुमच्या आधारची पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावी.
आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड वरील जर तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर त्याकरता कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता राहत नाही व याकरता फक्त तुम्हाला तुमचे आधार कार्ड देणे गरजेचे असते व जवळच्या आधार केंद्रावर जावे लागते.
साधारणपणे फोटो अपडेट करण्याच्या प्रक्रियेला 90 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तुम्हाला जी काही आधार अपडेट करण्याची पावती दिली जाते त्यामध्ये युआरएन नंबर असतो या नंबरचा वापर करून तुम्ही तुमच्या ऑनलाईन आधारचे स्टेटस तपासू शकतात.