Farmer Success Story :- बरेच व्यक्ती नोकरी करून जेव्हा निवृत्त होतात तेव्हा राहिलेले आयुष्याचे वर्ष हे सुखा समाधानाने आणि घरच्या कुटुंबांसमवेत जावे असे प्रत्येकाची इच्छा असते.
परंतु यातील काही व्यक्ती असे असतात की ते निवृत्तीनंतर देखील आरामात आयुष्य न घालवता काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असतात. काहीजण वेगळ्या ठिकाणी नोकरी करतात तर काही व्यक्ती व्यवसायांमध्ये शिरतात.
परंतु नोकरीच्या निवृत्तीनंतर शेतीमध्ये येणारे व्यक्ती फारच कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात. अगदी याच पद्धतीचे जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ येथील प्रगतिशील शेतकरी कर्नल हरिश्चंद्रसिंग यांची यशोगाथा पाहिली तर ती थोडी वेगळी आहे.
हरिचंद्र सिंग हे प्रगतिशील शेतकरी असून ते लष्करातून निवृत्त झालेले आहेत. जगातील लष्करातून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी शेती करायला सुरुवात केली व आज ते त्या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. त्यामुळे या लेखात आपण हरिचंद्र सिंह यांची यशोगाथा बघणार आहोत.
निवृत्त होण्यापूर्वी शेती करायचे निश्चित केले होते
प्रगतीशील शेतकरी कर्नल हरिश्चंद्रसिंह सांगतात की, त्यांनी निवृत्ती पूर्वी शेती करण्याचा निर्णय घेतला होता व 2015 मध्ये जेव्हा ते सैन्यातून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी लखनऊ जवळील बाराबंकी येथील आमसर्वा या गावांमध्ये जमीन विकत घेतली आणि त्या ठिकाणी शेती करायला सुरुवात केली.
ज्या ठिकाणी त्यांनी शेती घेतलेली होती त्या ठिकाणाचे लोक प्रामुख्याने धान आणि गहू यासारख्या पारंपारिक पिकांची लागवड करत होते. परंतु त्यांना दिसून आले की यामध्ये त्यांना फारसा नफा मिळत नव्हता. त्यानंतर मात्र हरिश्चंद्र सिंह यांनी शेतीमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे त्यांनी शेतीसंबंधी आवश्यक माहिती गोळा करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना युट्युब आणि कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून अधिक माहिती गोळा करत असताना सुपर फ्रुट्स विषयी माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारावर त्यांनी सुपर फ्रुट ची लागवड करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी अगोदर ड्रॅगन फ्रुट आणि एप्पल प्लमची देखील लागवड केली. तसेच त्यांनी सफरचंदाच्या तीन जातींचे देखील लागवड केली व या जातींमध्ये डोर सेट गोल्डन, ऐना आणि हरीमन 99 या जातींचा समावेश केला. एवढेच नाही तर त्यांनी चिया सीडची देखील लागवड केली. तेव्हा त्याची किंमत 1200 ते 1500 रुपये प्रति किलो होती.
पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये केला होता उल्लेख
तसेच हरिश्चंद्र सिंह यांनी याबद्दल सांगितले की, सुपर फ्रुट्स लागवडीनंतर त्यांनी जांभळ्या बटाट्याची लागवड करायला सुरुवात केली. त्यासोबतच त्यांनी काळा गहू आणि काळा तांदूळ देखील पिकवला. परंतु या दोन्ही पिकांच्या मार्केटिंग मध्ये समस्या असल्यामुळे त्यांनी त्याची लागवड सोडून दिली. हरिचंद्र सिंह यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते चिया बियाणे लागवड करणारे पहिले आणि उत्तर प्रदेश मध्ये ड्रॅगन फळे लावणारे दुसरे व्यक्ती आहेत.
त्यांच्या या लागवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात देखील त्यांचे कौतुक केले होते. आमसर्वा गावांमध्ये त्यांची चार एकर जमीन आहे व त्यावर ते शेती करतात.
तसेच आंबेडकर नगर मध्ये सात एकर जमीन असून त्यामध्ये ते फक्त उसाची लागवड करतात. याशिवाय सुलतानपूर मध्ये दहा एकर शेती आहे व त्या ठिकाणी देखील ते आता लवकरच वेगळ्या काहीतरी पिकांची लागवड करण्याचा विचार करत आहेत.
वार्षिक कमवत आहेत 15 लाखांपेक्षा जास्त नफा
त्यांचा वार्षिक खर्च आणि उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर कर्नल हरिश्चंद्र सिंग हे वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत. एका एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड करत असल्याचे त्यांनी सांगितले व यामध्ये त्यांनी 600 खांब बसवलेले आहेत.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की संपूर्ण हंगामामध्ये ड्रॅगन फ्रुटला सुमारे सात वेळा फुले येतात. एका खांब्यावर चार झाडांची लागवड केली असून 20 ते 25 किलो फळे या माध्यमातून मिळतात. म्हणजेच एका खांबाच्या माध्यमातून त्यांना एक हजार रुपयांचा नफा मिळतो.
म्हणजेच 600 खांबांचा विचार केला तर त्यांना सहा लाख रुपयांमध्ये मिळतात. म्हणजेच एक लाख रुपये खर्च वजा जाता ड्रॅगन फ्रुट मधून त्यांना पाच लाखांचा नफा मिळतो. तसेच चिया बियाणे देखील त्यांनी लागवड केली असल्यामुळे
त्याचे त्यांना पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळते. चिया सीडच्या लागवडीसाठी फारच कमी खर्च येतो आणि त्यातून मिळणारे उत्पन्न मात्र दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व पिके मिळून त्यांना एका वर्षाला 12 ते 16 लाख रुपयांचा नफा मिळतो.