Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिक इत्यादींसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
यामध्ये कृषी क्षेत्रासाठी विशेष योजना चालवल्या जात आहेत. यात ऊसतोड कामगारांसाठी देखील राज्य शासनाने एक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत ऊसतोड कामगारांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांचा जर अपघाती मृत्यू झाला तर राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांच्या वारसांना पाच लाखांपर्यंतची मदत दिली जाते. खरेतर ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह ऐरणीवर येत असतो.
यामुळे मयत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून राबवली जात असून याच योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे कामाचे अपडेट समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याअंतर्गत राज्यातील 67 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अर्थातच या 67 प्रकरणात ऊसतोड कामगाराच्या कुटुंबास प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे या निधीचे वितरण राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. आता आपण कोणत्या जिल्ह्यातील किती ऊसतोड कामगारांच्या परिवारांना हा लाभ मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यातील किती प्रस्ताव मंजूर झालेत
पुणे जिल्ह्यातील तीन, बीड जिल्ह्यातील 31, जालना जिल्ह्यातील तीन, अहमदनगर जिल्ह्यातील 23, धाराशिव जिल्ह्यातील सात असे एकूण 67 प्रस्ताव मंजूर झाले असून या संबंधितांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाकडून आता मिळाली आहे. यामुळे सदर मयत ऊसतोड कामगारांच्या परिवारांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.