Ahmednagar News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रसहित संपूर्ण देशभरात रस्ते विकासाची अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. रस्त्याची अनेक प्रकल्प शासनाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत. विविध महामार्गाची कामे गेल्या काही वर्षात पूर्णत्वास गेली असून यामुळे दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाली आहे.
अशातच आता अहमदनगर अर्थातच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी गोड बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे काल आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्ते मार्गाच्या कामांसाठी शेकडो कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रस्ते आता चकाचक होतील अशी आशा व्यक्त होत आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून आचारसंहिता जाहीर होण्यास अवघे काही तास बाकी असतानाच केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी 1,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीच ही माहिती दिली आहे. दरम्यान, आता आपण जिल्ह्यातील कोणत्या रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे ? याविषयी सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रस्त्यांसाठी मिळाला निधी ?
नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर ते आष्टी ते जामखेड (एनएच ५६१) या राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण काँक्रीटीकरणच्या कामासाठी ६५१.१५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
तसेच बेल्हा ते शिरूर ३८ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी ३८६.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय, श्रीगोंदा शहरातील काष्टी- श्रीगोंदा- आढळगाव रस्त्यावर लेंडी नाला पुलाच्या बांधकामासाठी १०.५५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
निश्चितच या तिन्ही कामांसाठी आवश्यक असलेला निधी मंजूर झाला असल्याने आता अहिल्या नगर जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवासा सोयीचा होणार अशी आशा व्यक्त होत आहे.